बाळासाहेब ठाकरेंना हक्कभंगाची नोटीस
वेबदुनिया
बिहारी खासदारांविरोधात सामनात लिहिलेल्या लेखाप्रकरणी संसदेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात मांडण्यात आलेल्या हक्कभंग प्रस्तावासंबंधी लोकसभेच्या सचिवालयाने ठाकरे यांना नोटीस बजावली आहे.
एक बिहारी सौ बिमारी नावाने काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे मुखपत्र सामानातून एक अग्रलेख प्रसिद्ध झाला होता.या लेखात ठाकरे यांनी बिहारी नेत्यांवर जोरदार टीका केली होती. तसेच बिहार हे दुसरे नरक असल्याचाही उल्लेख त्यांनी केला होता. बिहारच्या खासदारांवरही त्यांनी जबरदस्त टीका केली होती.
या नंतर ठाकरे यांच्या या वक्तव्याचा निषेध करत लोकसभेतील राष्ट्रीय जनता दलाचे खासदार देवेंद्र यादव आणि प्रभुनाथ झा यांनी ठाकरे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. या प्रकरणी ठाकरे यांना आता लोकसभा सचिवालयाने नोटीस बजावले आहे.
No comments:
Post a Comment