'आंबेडकरी समाज व आंबेडकरवादी समाज' या दोन्ही संज्ञा एकाच आहेत की, त्यामध्ये काही फरक आहे? आणि तो फरक जुजबी आहे कि नेम्केपानातून आहे? हे जाणून घेवू या. आंबेडकर हे नाम तर आंबेडकरवाद हे गुणविशेषण ठरून त्या नुसार वाद हा शब्द 'विचार' या अर्थाने अंतर्भूत आहे. मात्र तशी स्थिती आंबेडकरी या शब्दाची नाही.'श्रमकरी/कष्टकरी' कष्ट करणारा, 'गावकरी' म्हणजे विशिष्ट गावातील रहिवासी. त्या अर्थाने 'आंबेडकरी'म्हणजे कोण? तर आंबेडकरांच्या जाती जातीचा. फार तर ओढून ताणून त्यात अनु. जातीच्या सूचीमधील अन्य काही जातीच्या लोकांचा समावेश केला जावू शेकेल. मात्र त्यापलीकडे त्याची व्याप्त विस्तारता येत नाही.'आंबेडकरी' म्हणजे आंबेडकरांच्या धर्माचा असाही अर्थ घेत येत नाही; कारण पूर्वीचे महार (अतिसुद्र) जे नंतर बौद्ध झाले असा त्याचा अर्थ निघतो. उपरोक्त विवेचन लक्षात घेता, आंबेडकर शब्दाला लावलेल्या 'ई' या प्रत्यायामुळे आंबेडकरी म्हणजे आंबेडकरांच्या समाजचे अथवा जातीचे याहून वेगळा अर्थ घेत येत नाही. भारतात समाज म्हणजे 'जात-समाज' अशी रूढ संकल्पना आहे. त्यामुळे कुणबी समाज, तेली समाज, माळी समाज, अशा समाज संघटना अस्तित्वात आहेत. त्यानुसार आंबेडकरांचा समाज म्हणजे आंबेडकरांना अभिप्रेत समाज असाही अर्थ त्यातून काढता येत नाही. म्हणूनच 'आंबेडकरी समाज' व 'आंबेडकरी चळवळ' हि संबोधने म्हणजे महारी चळवळ अथवा दलित चळवळ असा त्याचा अर्थ होतो. हेच प्रचारित करण्यासाठी शेत्रुने आणूनबुजून 'आंबेडकरी' हा शब्द मोठ्या प्रमाणावर धृतपणे प्रसारित केला. आम्ही मात्र त्या शब्दाचा मुक्त वापर व्यापकतेच्या भावनेतून अज्ञान्वाश करीत होतो. परंतु त्या शब्दाचे मर्म काय? आणि त्या शब्दाला मैदानात उतरविनारयाची खेळी कोणती? या अनुषंगाने कधीच विचार केला नाही. मार्क्स च्या विचाराशी प्रतीबधता सांगणाऱ्याना जर मार्क्सकरी म्हणून संबोधित नाही; त्याच प्रमाणे गांधीशी संबधित वैचारिक प्रतीबधता बाळगणारयाना गांधीकरी म्हणत नाही तर मग आंबेडकरांशी वैचारिक प्रतीबधता सांगणारे 'आंबेडकरी' कसे? हा प्रश्न कधी आमच्या मनाला शिवला नाही. क्रमश. संदर्भ, आंबेडकरी आणि आंबेडकरवादी p ३०
No comments:
Post a Comment