|
|
नमस्कार, आपल्याला कल्पना असेल की गेल्या वर्षापासून मनिलाइफ फाऊंडेशन आर्थिक शिक्षणासाठी सर्वकष मोहिम राबवत आहे. मनिलाइफ फाऊंडेशन ही एक स्वयंसेवी संस्था असून, मागील सोळा महिन्यांच्या काळात संस्थेने वेगवेगळ्या विषयांवर ६९ मोफत कार्यशाळा घेतलेल्या आहेत. पहिल्यांदाच मराठीमध्ये! पैसा प्रत्येकाजवळ असतो पण कमवाण्यासोबत तो टिकवणे आणि वाढवणे सर्वांनाच जमते असे नाही त्याशिवाय आपल्यापैकी बर्याच जणांना आर्थिक व्यवहाराची पुरेशी माहिती नसते त्यामुळे बर्याचदा आपली फसवणूक होते आणि बघता-बघता हातातला पैसा निघून जातो आणि बँका, बँकेतले व्यवहार आणि ठेव योजना म्हणजे काय? बँकामधील ठेव आणि कर्जावर आकारल्या जाणार्या व्याजाचा हिशेब कसा करावा? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मनिलाइफ फाऊंडेशनने येत्या २ जुलै रोजी एक कार्यशाळा आयोजित केली आहे. मराठीमध्ये होणार्या या कार्यशाळेत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिध्द स्तंभलेखक आणि गेली २३ वर्षे गुंतवणूक सल्लागार म्हणून काम पाहणारे दिलीप सामंत येणार आहेत. |
|
(दिलीप सामंत: प्रसिध्द स्तंभलेखक व गुंतवणूक सल्लागार) |
|
|
या कार्यशाळेत आपल्याला माहिती नसलेल्या परंतु आवश्यक असलेल्या खालील गोष्टींचीही माहिती मिळेल. |
- विमा म्हणजे केवळ जीवन विमा नाही तर आरोग्य विमा आणि अपघात विमाही तेवढाच महत्वाचा असतो.
- कर्ज आणि कर्जाचे प्रकार, व्याजाची आकरणी कशी केली जाते.
- गृहकर्ज, वाहनकर्ज, शैक्षणिककर्ज घेताना घ्यावयची काळजी
- सोने खरेदी-हौस की गुंतवणूक?
- आर्थिक व्यवहारांसाठी बॅंक चांगली की पतपेढी चांगली?
- आर्थिक बाजारात आपली पत कशी सांभाळावी?
|
या व अशा अनेक प्रश्नांची योग्य उत्तरे मिळण्यासाठी मनिलाइफ फाऊंडेशनच्या मोफत (फ्री) कार्यशाळेला उपस्थित राहा . |
|
वेळ: दुपारी २ ते ४ दिनांक: २ जुलै २०११ स्थळ: मनिलाइफ फाऊंडेशन ३०५, तिसरा मजला, हिंद सर्विसेस इंडस्ट्रीज प्रीमायसेस, शिवाजी पार्क सीफेस, दादर, (प) पूर्वनोंदणी आवश्यक! मोजक्याच जागा शिल्लक! निराशा टाळण्यासाठी कृपया त्वरित संपर्क करा. डियोन / सेराफिना ०२२-२४४४१०५८/५९/६० email us at mail@mlfoundation.in or log on to www.mlfoundation.in |
|
No comments:
Post a Comment