BAMCEF UNIFICATION CONFERENCE 7

Published on 10 Mar 2013 ALL INDIA BAMCEF UNIFICATION CONFERENCE HELD AT Dr.B. R. AMBEDKAR BHAVAN,DADAR,MUMBAI ON 2ND AND 3RD MARCH 2013. Mr.PALASH BISWAS (JOURNALIST -KOLKATA) DELIVERING HER SPEECH. http://www.youtube.com/watch?v=oLL-n6MrcoM http://youtu.be/oLL-n6MrcoM

Monday, March 11, 2013

http://www.bahujanindia.in/index.php?option=com_content&view=category&id=105&layout=blog&Itemid=510

बामसेफमध्ये हुकूमशाहीमुळे फूट ; पुनर्रचनेचा निर्धार

  • PDF

व्यवस्था परिवर्तनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून स्थापन करण्यात आलेल्या बामसेफमध्ये हुकुमशाही प्रवृत्तीच्या नेतृत्वामुळे फूट पडल्याचा सूर संघटनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बैठकीत लावण्यात आला. सामाजिक क्रांतीच्या उद्देशाला आणि संघटनेलाही मारक ठरणाऱ्या नेतृत्वाला दूर करुन बामसेफची नव्याने पुनर्रचना करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. division in bamsef is due to autocracy; determination fir rearrangement
रिपब्लिकन पक्षाप्रमाणेच देशभर फोफावलेल्या बामसेफ या सरकारी-निमसरकारी क्षेत्रातील मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संघटनेला फुटीने ग्रासले आहे. गेल्या चार-पाच वर्षांत आठ-दहा गट उदयास आले आहेत. त्यामुळे गेली वीस-पंचवीस वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांंमध्ये अस्वस्थता आहे. त्यातूनच काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अंतर्गत गटबाजीला मूठमाती देऊन बामसेफच्या एकीकरणीसाठी पुढाकार घेतला आहे. 
बामसेफच्या एकीकरणाचाच एक भाग म्हणून शनिवारी दादर येथील आंबेडकर भवनमध्ये देशभरातील विविध गटातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला १८ राज्यांतून २०० ते २५०  प्रमुख पदाधिकारी आले होते. त्यात बामसेफचे विविध गट चालविणाऱ्या चमनलाल (उत्तर प्रदेश), शिवाजी राय व ज्योतिनाथ (बिहार), अभिराम मलिक (ओरिसा), अब्दुल सुकुर (कर्नाटक), ताराराम मेहना ( राजस्थान), तसेच सुबच्चनराम आणि बामसेफचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष बी. डी. बोरकर इत्यादी प्रमुख नेत्यांचा समावेश होता. मराठा सेवा संघाचे सल्लागार अ‍ॅड. अनंत दारवटकर हेही या बैठकीला उपस्थित होते. बामसेफच्या ऐक्याबरोबरच, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, अशा समविचारी संघटनांनाही बरोबर घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. 
व्यवस्था परिवर्तनासाठी बामसफेची स्थापना करण्यात आली होती. परंतु काही लोक हे उद्दिष्टच विसरले आणि संघटनेपेक्षा स्वतला मोठे समजू लागले, त्यातून संघटनेत फुटीची प्रक्रिया सुरु झाली असे विश्लेषण बैठकीत करण्यात आले. खास करुन एककल्ली व हुकुमशाही प्रवृत्तीच्या नेतृत्वामुळे संघटनेत फूट पडल्याची टीका बोरकर यांनी केली. उद्या पुन्हा बैठक होणार असून त्यात बामसफेचे एकीकरण, पुढील कार्यक्रम व आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे.

बामसेफच्या ऐक्याची बैठक वादळी ठरणार

  • PDF

एकेकाळी बहुजन समाज पक्षाला आर्थिक रसद आणि बुद्धिजीवी मनुष्यबळ पुरविणाऱ्या बामसेफ या सरकारी व निमसरकारी क्षेत्रातील मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संघटनेत अनेक गट-तट पडल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांनीच आता प्रस्थापित नेतृत्वाविरुद्ध बंडाचा झेंडा फडकावत संघटनेच्या ऐक्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी उद्या शनिवारी व रविवारी विविध गटांतील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. प्रस्थापित नेतृत्वालाच आव्हान दिले जाणार असल्याने ही बैठक काहीशी वादळी ठरण्याची शक्यता आहे. alt
बसपचे संस्थापक कांशीराम यांच्या पुढाकारातूनच बामसेफ या संघटनेची स्थापना करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या सेवेतील मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना संघटित करण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. देशभर ही संघटना फोफावली. केडर बेस्ड या संघटनेचे देशभरात एक लाखाच्या वर सदस्य आहेत. त्यात आएएएस, आयपीएस अधिकाऱ्यांपासून ते चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. या संघटेच्या जिवावरच कांशीराम यांनी बसपची स्थापना केली. याच बसपने पुढे उत्तरेतील काही राज्यांमध्ये दमदार राजकीय वर्चस्व प्रस्थापित तर केलेच शिवाय उत्तर प्रदेशची सत्ताही हातात घेतली. बसपच्या सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी मात्र या संघटनेकडे फारसे लक्ष्य दिले नाही. परिणामी संघटनेतही नेतृत्वाच्या वादातून अनेक गट-तट जन्माला आले. सध्या बामसेफ आठ ते दहा गटात विभागली आहे. त्यामुळे गेली वीस-पंचवीश वर्षांपासून संघटनेत निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. अशा कार्यकर्त्यांनी आता प्रस्थापित नेतृत्वाला आव्हान देत संघटनेची पुनर्माडणी करण्याचे ठरविले आहे. 
दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये उद्या सकाळी दहापासून सायंकाळपर्यंत कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला देशभरातून जवळपास ३५० ते ४०० कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मूळ घटनेवर आधारीत संघटनेची फेररचना करण्याबाबत कार्यकर्त्यांची मनोगते जाणून घेतली जाणार आहेत. रविवारी दुसऱ्या दिवशीच्या बैठकीत नव्या स्वरुपातील संघटनेच्या स्थापनेला अंतिम स्वरुप दिले जाणार आहे, अशी माहिती बामसेफ समन्वय समितीच्या वतीने देण्यात आली.

No comments:

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...