BAMCEF UNIFICATION CONFERENCE 7

Published on 10 Mar 2013 ALL INDIA BAMCEF UNIFICATION CONFERENCE HELD AT Dr.B. R. AMBEDKAR BHAVAN,DADAR,MUMBAI ON 2ND AND 3RD MARCH 2013. Mr.PALASH BISWAS (JOURNALIST -KOLKATA) DELIVERING HER SPEECH. http://www.youtube.com/watch?v=oLL-n6MrcoM http://youtu.be/oLL-n6MrcoM

Monday, March 11, 2013

विलक्षण चळवळीचं नेतृत्व

विलक्षण चळवळीचं नेतृत्व

विलक्षण चळवळीचं नेतृत्व
'विकिमिडिया फाऊंडेशन' या जगभर ज्ञान- माहितीचा प्रसार करणाऱ्या अनोख्या चळवळीच्या घडामोडींना वेग देण्याच्या मुळाशी बिशाखा दत्त ही एक भारतीय स्त्री आहे.

इंटरनेटशिवायच्या जगाची आता कल्पनाही करता येणार नाही. तशीच इंटरनेटवर कोणतीही माहिती शोधायची असेल तर गुगल आणि विकिपिडियाशिवाय कुणी पुढे जाऊ शकत नाही. विकिपिडियाच्या मुळाशी आहे विकिमीडिया फाउंडेशन. विकिमीडिया फाउंडेशन ही जगभर ज्ञान-माहितीचा प्रसार करणारी अनोखी चळवळ आहे. माहिती स्रोताचा खुलेपणा हे तिचं वैशिष्टय़ं आहे. माहितीवर सगळ्यांचा अधिकार म्हणून ती द्यायचीही सगळ्यांनी असं म्हणून विकिमीडिया फाउंडेशनने विकिपिडियाची निर्मिती केली. विकिपिडियावर माहिती टाकणाऱ्या, ती संपादित करणाऱ्या कार्यकत्यांचं जाळं तयार केलं. विकिमीडिया जे काही करतं, ज्या नवनवीन कल्पना आणतं, त्यामागे जी धोरणं असतात, त्यांच्या रचनेत एका भारतीय व्यक्तीचाही हात आहे. ती भारतीय व्यक्ती म्हणजे बिशाखा दत्ता. त्या विकिमीडिया फाउंडेशनच्या जागतिक पातळीवरच्या दहा विश्वस्तांपैकी आहेत. दर पाच वर्षांनी हे विश्वस्त बदलले जातात. विकिमीडिया फाउंडेशनला सध्याच्या टर्मसाठी दक्षिण आशियामधून विश्वस्त म्हणून एक व्यक्ती हवी होती. त्यासाठी २०१० मध्ये भारतातून बिशाखा दत्ता यांची निवड झाली. 
बिशाखा सांगतात विकिमीडिया फाउंडेशनचे जागतिक पातळीवरच्या विश्वस्त मंडळाचे वेगवेगळ्या देशांमधून आम्ही सात पुरुष, तीन स्त्रिया असे एकूण दहाजण मुख्य विश्वस्त आहोत. विकिपिडिया ही विकिमीडिया फाउंडेशनची वेबसाइट ही जगातली पाचवी सगळ्यात मोठी वेबसाइट आहे. पण सॅनफ्रान्सिस्कोमध्ये असलेलं आमचं ऑफिस अगदी लहान आहे. तिथे अगदी थोडी माणसं काम करतात. विकिपिडियाचं खरं काम चालतं जगभर पसरलेल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर. 
साहजिकच विश्वस्त हेसुद्धा मानद असतात. तुमची काम करायची, जगाशी जोडून घ्यायची हौस, आनंद यासाठी करायचं हे काम. ते बिशाखा यांना का करावंसं वाटलं?
त्यांचा जन्म कोलकात्यातला, पण त्या वाढल्या मुंबईत. दोन-तीन वर्षे इंग्रजी पत्रकारिता केल्यानंतर त्या या क्षेत्रातून बाहेर पडल्या. त्यांना काहीतरी वेगळं करायचं होतं. डॉक्युमेंट्रीज, नाटक, अशा वेगवेगळ्या फॉर्ममधून म्हणजेच कलेच्या माध्यमातून स्त्रियांचे प्रश्न मांडायचे असं काहीतरी डोक्यात होतं. तशा पद्धतीने त्यांनी काम सुरू केलंही, आज त्याची परिणती पॉइंट ऑफ व्ह्य़ू नावाच्या एनजीओमध्ये झाली. आज ही एनजीओ मुंबईत धारावी परिसरात स्त्रियांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करते.
त्या सांगतात विकिमीडिया फाउंडेशनमध्ये माझं काम हे जागतिक पातळीवरची धोरणं ठरवण्यामध्ये सहभागी होणं हे आहे. वर्षभरातून होणाऱ्या चार मीटिंग्जमधून आम्ही पुढे काय करायचं याचे निर्णय घेतो. अनेक गोष्टी असतात. उदाहरणार्थ मुख्य विकिमीडिया फाउंडेशनला काम करणं सोपं जावं म्हणून इंडिया चॅप्टर, युरोप चॅप्टर, आफ्रिका चॅप्टर असे वेगवेगळे ३९ चॅप्टर्स आहेत. त्याशिवाय नवनवीन लोकांना सहभागी व्हायचं असतं. त्यांच्या गरजा, मागण्या वेगळ्या असतात, त्यासाठीचे धोरणात्मक निर्णय घेणं हे तसं आव्हानात्मक असतं. कारण विकिमीडियाची काम करण्याची पद्धत लक्षात घेऊन ते करायचे असतात.

८ मार्चला म्हणजे जागतिक महिला दिनाच्या दिवशी सुरू होणाऱ्या आणि महिनाभर चालणाऱ्या या उपक्रमात जगभरात सगळीकडे स्त्रियांची चरित्रं, त्यांच्या विषयीचा मजकूर विकिपिडियावर टाकला जाणार आहे.

त्यासाठी बिशाखा दत्त यांनी दिलेलं उदाहरण अगदीच बोलकं आहे. गेल्या वर्षी विकिमीडिया फाउंडेशनकडे जमा झालेला फंड कसा खर्च करायचा याचा निर्णय घ्यायचा होता. ८.७ दशलक्ष डॉलर्स एवढा पैसा कसा खर्च करायचा हे ठरवायचं कसं? विकिपिडियावरून जाहीर केलं गेलं, हे पैसे कसे खर्च करायचे याचा निर्णय आपण योग्य प्रकारे घेऊ शकतो, असं तुम्हाला वाटत असेल तर पुढे येऊन तो योग्य प्रकारे खर्च करण्यासाठी अर्ज करा. विकिमीडिया फाउंडेशनच्या स्वयंसेवकांमधून आलेल्या ७० अर्जामधून मुलाखती, चर्चा असं सगळं होऊन सात जण निवडले गेले. ही सात जणांची कमिटी आता एवढा मोठा पैसा कसा खर्च करायचा याचा निर्णय घेते. 
बिशाखा दत्ता यांचा समर्पक प्रश्न असतो, असं कुठे घडतं? 
एवढी मोठी रक्कम खर्च करण्याचा निर्णय सहसा एखादी अतिवरिष्ठ व्यक्तीच घेते. पण विकिमीडियात मात्र आलेला पैसा खर्च करायचा त्याचा निर्णय स्वयंसेवकच घेतात. विकिमीडिया फाउंडेशनअंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या संघटनांना त्यांच्या गरजांसाठी, कामांसाठी लागणाऱ्या पैशांचं प्रपोजल पाठवतात आणि ही सात जणांची कमिटी त्याची शहानिशा करून कुणाला किती पैसे द्यायचे ते मुख्य बोर्डाला शिफारस करते. 
बिशाखा यांनी भारतात पत्रकार म्हणून काम केलं आहे. स्वत:ची एक एनजीओ चालवली आहे. जगात पैशाच्या वाटपाची कामं कशा रीतीने होतात हे त्यामुळेच त्यांना चांगलं माहीत आहे. आणि त्यामुळेच विकिमीडिया फाउंडेशन हाताळते हे मार्ग कसे अगदीच वेगळे आहेत ते त्यांना खूप प्रकर्षांने जाणवतं. 
त्यांना विकिमीडिया फाउंडेशनच्या बोर्डावर काम करताना आता असा वेगळ्या पद्धतीने विचार करायची सवय झाली आहे. त्यांचं बोर्ड कसं वेगळ्या पद्धतीने काम करतं याचं त्यांनी दिलेलं आणखी एक उदाहरण म्हणजे विकिमीडिया फाउंडेशनचे जे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत, ते स्वतंत्र एनजीओ म्हणून काम करतात, ते नोंदणीकृत असतात. पण काही लोक असे असतात, त्यांना अशा देशाच्या, प्रांताच्या सीमांमध्ये राहून काम करायला आवडत नाही. म्हणजे भारतातला एखादा माणूस असतो, त्याला विकिमीडिया फाउंडेशनबरोबर स्वयंसेवक म्हणून काम करायचं असतं, पण त्याला इंडिया चॅप्टर या विकिमीडिया फाउंडेशनच्या भारतातल्या एनजीओबरोबर काम करण्यात रस नसतो. त्याला त्यापेक्षाही भाषेच्या प्रश्नांमध्ये रस असतो किंवा समुद्री पर्यावरण हा त्याचा आवडीचा विषय असतो. त्याला विकिमीडिया फाउंडेशन या चळवळीत भाग घ्यायचा असतो, तिथे स्वत:ची स्पेस हवी असते, पण ग्रुप म्हणून नोंदणी करणं, वगैरे नको असतं, आता अशा लोकांसाठी विकिमीडिया फाउंडेशनने त्यांच्या आवडीनुसारचे गट केले आहेत. 
बिशाखा आणि त्यांच्या सोबतच्या विश्वस्तांनी असे वेगवेगळे धोरणात्मक निर्णय घेतले आहेत या निर्णयांना विकिमीडिया फाउंडेशनच्या उपक्रमांवर खूप परिणाम होतो आहे. 
ही सगळी काम करण्याची पद्धतच विलक्षण, वेगळी, नवी आहे असं बिशाखा यांना वाटतं. 
बिशाखा यांना स्त्रियांच्या प्रश्नांमध्ये रस आहे. मुख्य म्हणजे त्या जिथे जिथे जातात तिथे तिथे त्या हाच अजेंडा घेऊन जातात. विकिमीडिया फाउंडेशनही त्याला अपवाद नाही. त्यांच्या असं लक्षात आलं की विकिपिडियाचे जगभर पसरलेले जे ८० हजार स्वयंसेवक आहेत, त्यांच्यामध्ये मजकूर संपादित करणारे संपादक हे ९० टक्के पुरुष आहेत. त्या सांगतात, त्यामागे अनेक कारणं आहेत. सगळ्यात मुख्य कारण तंत्रज्ञान. विकिपिडियावर जाऊन मजकूर संपादन करणं अनेक स्त्रियांना खूप अवघड वाटतं. ते शिकण्यासाठी घरातल्या पुरुषांची मदत मागितली तर विरोधच व्हायची शक्यता असते. त्यामुळे स्त्रिया या सगळ्यापासून लांब राहणंच पसंत करतात. 
बिशाखा यांच्या मते विकिपिडिया हा जर ज्ञानाचा स्रोत आहे, तर तो सगळ्यांना सारखाच खुला असायला हवा. त्यासाठी मजकूर टाकणाऱ्या, तो संपादित करणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढायला हवी. त्यांची संख्या वाढली की त्यांचे विषय विकिपिडियावर येतील. विकिपिडियाला आणखी पैलू पडतील. स्त्रिया विकिपिडियाचं विश्व आणखी समृद्ध करतील. 
हे कसं करायचं?
त्यासाठी विकिमीडिया फाउंडेशनने एक वेगळा उपक्रम हातात घेतला आहे. त्याचं नाव आहे एडिट-ए-थॉन. आठ मार्चला म्हणजे जागतिक महिला दिनाच्या दिवशी सुरू होणाऱ्या आणि महिनाभर चालणाऱ्या या उपक्रमात जगभरात सगळीकडे स्त्रियांची चरित्रं, त्यांच्या विषयीचा मजकूर विकिपिडियावर टाकला जाणार आहे. आठ मार्चला त्याचं ऑनलाइन उद्घाटन, चर्चा, या उपक्रमाचं स्वरूप समजून घेणं आणि मग पुढे महिनाभर मोठय़ा प्रमाणात स्त्रियांचं मजकुराच्या पातळीवरचं प्रतिनिधित्व वाढवण्याचं काम चालणार आहे. या उपक्रमात कुणीही ऑनलाइन सहभागी होऊ शकतो. आपल्या देशातला हा उकप्रम बिशाखा गोव्यामधून हाताळणार आहेत. 
स्त्रियांचा विकिपिडियामधला सहभाग वाढावा यासाठी त्यांनी नोव्हेंबर महिन्यातच विकिपिडियावर मजकुराचं संपादन कसं करायचं याचं ट्रेनिंग देणारी खास महिलांसाठीची कार्यशाळा घेतली होती. सत्तर जणींनी त्यात भाग घेतला होता. 
महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी असे सक्रिय प्रयत्न करण्यावर बिशाखा यांचा भर आहे, कारण त्यामागे त्यांच्या स्त्रियांच्यासाठीच्या कामातून आलेला अनुभव आहे. आपलं निरीक्षण मांडताना त्या सांगतात, आजच्या काळात प्रत्येकाला इंटरनेटवर यायचं आहे. आम्ही एका प्रशिक्षणासाठी बिहार, उत्तर प्रदेशमधून काही स्त्रियांना मुंबईत आणलं होतं. अगदी गावखेडय़ांमधून आलेल्या, छोटी छोटी नियतकालिकं चालवणाऱ्या स्त्रिया होत्या त्या. इथं मुंबईत त्यांना काही वर्तमानपत्रांमध्ये नेलं, तर त्यांनी त्या भेटीदरम्यानचे मोबाइलवर फोटो काढून ते लगेच तिथल्या तिथे फेसबुकवर अपलोड केले. त्यासंबंधी भरभर कुणाकुणाला ट्विटही केलं. मोठय़ा नियतकालिकांच्या इंटरनेट आवृत्त्या बघितल्यावर आपली छोटय़ा -छोटय़ा गाव पातळीवरून स्थानिक भाषेत निघणाऱ्या नियकालिकांच्या इंटरनेट आवृत्त्या काढण्याचा आग्रह आता त्यांनी धरला आहे. राज्याबाहेर राहणारे लोक आपली स्थानिक भाषेतली नियतकालिकं इंटरनेटवर बघतील असाही त्यांचा आग्रह आहे.
गाव पातळीवरच्या स्त्रियांच्या फेसबुक, ट्विटरवर असण्याच्या, इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जोडून घेण्याच्या या प्रेरणा बिशाखा दत्त यांना खूपच महत्त्वाच्या वाटतात. त्या म्हणतात, लहान लहान गावांमधून राहणाऱ्या या स्त्रियांना काय करायचंय इंटरनेट वगैरे असं कुणी म्हणत राहिलं तर ते मुद्दे ओलांडून पुढे जाण्याची क्षमता, प्रेरणा स्त्रियांमध्ये आहे. त्यांची ही ऊर्जाच विकिमीडिया फाउंडेशनमधली स्त्री-पुरुषांच्या संख्येमधली दरी एक दिवस मिटवू शकेल. त्यासाठीचा आत्ताचा मुख्य अडथळा भाषेचा आहे. आज इंटरनेट हाताळताना इंग्रजी हीच भाषा सगळ्यात महत्त्वाची आहे. पण इतर भाषा जास्तीतजास्त संख्येने, जास्तीतजास्त प्रमाणात इंटरनेटच्या आवाक्यात आणल्या तर भाषेचा अडसर दूर होईल. आजच्या घडीला भारतातल्या २० प्रमुख भाषा विकिपिडियावर आहेत. त्याहून लहानलहान भाषाही यापुढच्या काळात यायला हव्या आहेत. विकिपिडियावर भारतीय भाषांमधे मजकुराचं संपादन करणारे लोक वाढवण्यासाठी विकिमीडिया फाउंडेशनने बंगलोरमधल्या सेंटर फॉर इंटरनेट अ‍ॅण्ड सोसायटीला अनुदान दिलेलं आहे. 
भारतात विकिमीडियाचा इंडिया चॅप्टर हा गट काम करतो. त्याशिवाय मल्याळम्, तेलुगु, बंगाली अशा वेगवेगळ्या कम्युनिटीज आहेत. मुंबई ग्रुप, पुणे ग्रुप असे गट आहेत. वीस- बावीसच्या दरम्यानची तरुण मुलं या गटांमध्ये सहभागी असतात. या सगळ्या लोकांना ऑनलाइल, ऑफलाइन सतत भेटत राहणं, त्यांच्या गरजा समजून घेणं, त्या वपर्यंत पोहोचवणं हे सगळं काम बिशाखा करतात. विकिमीडियाची फाउंडेशन ही विलक्षण चळवळ गाव पातळीवरच्या मालवणी, कोकणी, अवधी अशा भाषा बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या, वाचणाऱ्या स्त्रियांपर्यंत त्यांना न्यायची आहे.

http://www.lokprabha.com/20130315/mahila-vishesh-03.htm

No comments:

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...